पती-पत्नीत भांडण झाल्यानंतर प्रकरण कोर्टापर्यंत गेले आणि अखेर कोर्टाच्या संमतीनंतर पती-पत्नीत घटस्फोट झाला त्यानंतर संतप्त झालेल्या पत्नीने कोर्टाच्या आवारातच पतीच्या आणि सासऱ्याच्या जोरदार कानाखाली वाजवल्या. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे हा प्रकार घडलेला असून न्यायालयाच्या आदेशाने दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील पोखरी येथे सुवर्णा सुभाष लुटे नावाच्या महिले तरुणीचा विवाह भोकरदन तालुक्यातील शुभम विनायक साळवे यांच्यासोबत विवाह झालेला होता मात्र त्यांच्यात पटत नसल्याने सुवर्णा या अखेर माहेरी निघून गेल्या त्यानंतर नातेवाईकांनी एकत्र येत अखेर त्यांचा संसार पुढे टिकणार नाही म्हणून न्यायालयात फारकत घेण्यासाठी अर्ज केला.एकतीस तारखेला न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी दोन्ही बाजूंच्या वतीने न्यायालयाने म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अखेर वकिलाकडून नोटरी करून घेत दोघांनीही फारकत घेतली. ठरल्याप्रमाणे शुभम याने सुवर्णा यांना चार लाख रुपये देखील दिले इथपर्यंत सर्व प्रकार शांततेत पार पडला.
सदर प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल असे अपेक्षा असताना संतप्त झालेल्या सुवर्णा यांनी पळत जाऊन सासरा असलेला विनायक साळवे यांच्या जोरदार कानाखाली वाजवल्या त्यानंतर पती तिथे आला त्याला देखील सुवर्णा यांनी जोरदार कानाखाली वाजवल्या. त्यांच्यातील हा प्रकार पाहून दोन्ही बाजूचे मंडळी एकमेकांवर तुटून पडले आणि प्रकरण न्यायाधीश यांच्यापर्यंत पोहोचले. न्यायाधीश यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक युवराज पाडळे यांना दोन्ही गटांना शांत करण्याचे सांगितले आणि त्यानंतर पोलीस कर्मचारी यांच्या तक्रारीवरून विनायक किसन साळवे, सुवर्णाचे सुभाष लुटे, शुभम विनायक साळवे, विलास माणिक साळवे, पंडित किसन साळवे, शिवाजी भोम्बे, सर्जेराव पाटील तांगडे, निवृत्ती सुभाष लुटे, गजानन वामन जगताप, देविदास सुरडकर यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.