पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून हॉटेलच्या समोर उभ्या केलेल्या शेडवर कारवाई करण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देत तब्बल दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात मागितल्याचा प्रकार समोर आलेला आहे. तडजोड झाल्यानंतर अखेर एक लाखांवर हा व्यवहार झाला मात्र याच दरम्यान खंडणी घेण्यासाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांनी उत्तमनगर पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, सुभाष अशोकराव सहजराव ( वय ३५ राहणार कुडजे ) आणि बाळासाहेब हरिभाऊ लोणारे ( वय 58 राहणार वारजे माळवाडी ) अशी आरोपी व्यक्तींची नावे असून तक्रारदार व्यक्ती सुकेश शेट्टी यांनी यासंदर्भात उत्तम नगर पोलिसात फिर्याद दिलेली आहे.
सुकेश शेट्टी यांचे माळवाडी येथे एक हॉटेल असून त्यांनी हॉटेलच्या समोर ताडपत्रीचे शेड उभारलेले आहे. हे शेड बेकायदेशीर असून महापालिकाकडून त्यावर कारवाई करायला लावतो अशी धमकी आरोपींनी त्यांना दिलेली होती आणि कारवाई करू नये असे वाटत असेल तर आम्हाला दोन लाख रुपये खंडणी द्या असे देखील त्यांनी म्हटलेले होते. सुरुवातीला शेट्टी यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले मात्र त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी व्यवस्थित पद्धतीने सापळा रचलेला होता त्यानुसार शेट्टी यांनी त्यांना रक्कम देण्याची तयारी दाखवली आणि एक लाख रुपये घेण्यासाठी शिवने येथे संध्याकाळी सात वाजता शनिवारी त्यांना बोलवण्यात आले. आरोपी तिथे आल्यानंतर रक्कम स्वीकारत असतानाच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आणि त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात केली.