अपहरण करून विक्री केलेले बाळ अखेर आईच्या ताब्यात

Spread the love

महाराष्ट्रातील भिवंडी येथे कामतघर परिसरात 26 डिसेंबर रोजी एका दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला होता. पोलिसांनी त्यानंतर तात्काळ कारवाई करत अखेर या मुलाची सुटका केलेली असून अपहरण करणाऱ्या व्यक्तीसोबत दोन महिलांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सुंदरी रामगोपाल गौतम या यांच्या राहत्या घरात कपडे धुत असताना त्यांचा दीड वर्षांचा मुलगा सिद्धांत याचे घराच्या बाहेरून अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलेले होते त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल होत गुन्हा नोंदवला आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

गणेश मेमूला नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले त्यानंतर त्याची कसून तपासणी केली त्यावेळी त्याने आपण हे मूल एक हजार एक लाख पाच हजार रुपयांना एका व्यक्तीला विकल्याचे कबूल केले. पोलीस पथकाने त्यानंतर तात्काळ पद्मा नगर परिसरात नवजीवन कॉलनी येथे भारती साहू ( वय 41) आणि आशा साहू ( वय 42 ) या दोघींना ताब्यात घेतले आणि त्यांच्या ताब्यातून या मुलाची सुटका करण्यात आली.

सिद्धांत याचे वडील पानटपरीचा व्यवसाय करत असून अचानकपणे मुलगा बेपत्ता झाल्यानंतर कासावीस झालेले होते. व्यवसाय बंद करून त्यांनी भिवंडी ठाणे कल्याण भिवंडी परिसर पिंजून काढला होता मात्र तरी देखील तो आढळून आला नाही त्यामुळे अन्न पाणी देखील सोडले होते. पोलिसांनी तात्काळ त्यांच्या तक्रारीची दखल घेतली आणि त्यानंतर एक महिन्यांच्या आत या बाळाची सुटका केली त्याबद्दल पोलिसांचे परिसरात कौतुक केले जात आहे.


Spread the love