महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना काही वर्षांपूर्वी पुण्यात उघडकीला आलेली होती. सदर प्रकरणी न्यायालयासमोर पीडित तरुणी आणि तिची आई फितूर झाल्या मात्र तरी देखील पुराव्यांच्या आधारे विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी आरोपीला वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. डीएनए रिपोर्ट याप्रकरणी महत्त्वाचा ठरलेला असून आरोपीला ही शिक्षा भोगावी लागणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार, संतोष लक्ष्मण चव्हाण असे आरोपीचे नाव असून अल्पवयीन असलेली तरुणी ही आरोपीकडे 2015 पासून शिक्षणासाठी राहत होती. 28 सप्टेंबर 2019 रोजी तिच्या पोटात दुखू लागले म्हणून तिची दवाखान्यात तपासणी केली त्यावेळी ती चक्क गरोदर असल्याचा प्रकार समोर आला. पीडित मुलीच्या आईने तिला माहिती विचारली त्यावेळी तिने काहीही माहिती दिली नाही त्यानंतर तिची आई तिला पुण्याला घेऊन गेली.
पुण्याला आल्यानंतर तीस सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयातील नेण्यात आले त्यावेळी पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्या कारणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी खबर देण्यात आली आणि पीडित मुलगी आणि तिच्या आईचा जबाब नोंदवून आरोपी संतोष चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला . घटना ही अक्कलकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असल्याने गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आला आणि पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केली.
पीडित मुलगी आणि तिची आई ससून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काहीही कारण न देता तिथून निघून गेल्या त्यानंतर अक्कलकोट पोलिसांनी पीडित मुलीला सिविल हॉस्पिटल येथे तपासणीसाठी पाठवले आणि त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी तिने एका मुलाला जन्म दिला. जन्मलेले बाळ आणि आरोपी व्यक्ती यांचे डीएनए टेस्ट केल्यानंतर आरोपी स्पष्ट झाल्यावर आरोपीच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र पाठवण्यात आले. साक्षीच्या वेळी पीडित मुलगी आणि तिची आई फितूर झाले मात्र न्यायालयाने आरोपी संतोष लक्ष्मण चव्हाण याला दोषी ठरवून वीस वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपयांचा दंड सुनावला आहे