बलात्कार होण्यापूर्वीच महिला पळत सुटली , पुण्यातील प्रकार

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथे उघडकीला आलेली असून अवैधरीत्या दारू वितरित करणाऱ्या व्यक्तींकडून दारू विक्री करणाऱ्या 35 वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रकार प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. बारामती तालुक्यातील एका गावातील महिलेने माळवाडी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, नवनाथ गव्हाणे ( राहणार माळेगाव खुर्द तालुका बारामती जिल्हा पुणे ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो फरार झालेला आहे. 26 तारखेला दुपारी माळेगाव खुर्द येथील एका बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये हा प्रकार घडलेला असून पीडित महिला दुपारी दोन वाजता नवनाथ गव्हाणे याच्याकडे दारू आणण्यासाठी गेलेल्या होत्या त्यावेळी त्याने दारू देण्याच्या पाहण्याने त्यांना एका फ्लॅटमध्ये तो घेऊन गेला.

फ्लॅटमध्ये आल्यानंतर त्याने तात्काळ फ्लॅटचा दरवाजा आतून बंद केला आणि त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिला यांनी त्याला विरोध केला त्यावेळी त्याने सावकारकीचा खोटा गुन्हा तुझ्यावर दाखल करेल अशी देखील धमकी दिली मात्र महिलेने डगमगून न जाता तिथून पळ काढला आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.


Spread the love