तक्रारदार बायकोचा ‘ बदला ‘ घेण्यासाठी नवऱ्याने लाज सोडली अन ..

Spread the love

देशात एक खळबळजनक अशी घटना बिहारमधील पटना येथे समोर आलेले असून एका महिलेकडून तिच्या पतीबाबत खळबळजनक असा दावा करण्यात आलेला आहे. पीडित महिलेने आपला पती आपल्याला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडतो आणि त्यांच्यासोबत तोदेखील आपल्याला शिवीगाळ आणि मारहाण करतो असे म्हटलेले आहे. पाटणा येथील नेपाली नगर येथे ही महिला राहत असून पोलिसांनी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

महिलेच्या म्हणण्याप्रमाणे ती तिच्या चार मुलींसोबत नेपाली नगर येथे राहत असून तिचा पती विनोद महतो हा सतत तिच्यासोबत मारहाण करतो आणि मित्रांना घरी बोलावून त्यांच्यासोबत तिचे शारीरिक शोषण करतो. घर चालवण्याचा सर्व खर्च आपण स्वतः करत असून तिचा पती हा तिच्यासोबत अमानवीय वागणूक करत सतत तिला त्रास देतो. महिलेच्या म्हणण्याप्रमाणे मारहाण केल्यामुळे याआधी देखील एकदा तिचा गर्भपात झालेला आहे.

महिलेने म्हटले आहे की, आतापर्यंत माझा पती हा एकटाच माझे शारीरिक शोषण करत होता मात्र मी त्याला विरोध केला नाही म्हणून तो चक्क त्याच्या मित्रांना घरी आणून माझ्यासोबत जबरदस्ती करण्यास त्याने सुरुवात केली. आपण विरोध करू लागल्यानंतर त्याने आपल्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आपण बिहार पोलिसांच्या ११२ नंबर वर फोन केला मात्र पोलीस त्यानंतर पोलीस घरी आले आणि त्याला घेऊन गेले मात्र अवघ्या काही वेळा पोलिसांनी त्याची मुक्तता केली त्यानंतर तो घरी आला तेव्हा तो एकटा नव्हता तर त्याच्यासोबत त्याचे मित्र देखील होते. आधी पतीने आपल्याला मारहाण केली आणि त्यानंतर मुलांना देखील मारहाण करत व त्याने आपल्यावर मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला असे म्हटलेले आहे.


Spread the love