सोशल मीडियावर सध्या परीक्षेला जाणाऱ्या एका तरुणाची जोरदार चर्चा सुरू असून पेपरला गेल्यानंतर या मुलाला चांगलाच पॅनिक अटॅक आलेला आहे अर्थात हा अटॅक त्याला पेपरमुळे आलेला नाही तर पेपरला गेल्यानंतर 500 मुलींच्यामध्ये हा एकटाच तरुण होता त्यामुळे तो घाबरून गेला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. बिहार येथील हे प्रकरण आहे .
बिहार इंटरमिजिएट परीक्षा एक फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या असून विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या केंद्रावर जाऊन परीक्षा देत आहेत. नालंदा येथे हा प्रकार घडलेला असून परीक्षा केंद्रात 500 तरुणी आल्या आणि त्यांच्या दरम्यान हा एकच तरुण तिथे पेपर देण्यासाठी पोहोचलेला होता. इतक्या सगळ्या मुलींच्यामध्ये बसून पेपर द्यायचा या कल्पनेनेच त्याला घामा फुटला आणि त्यानंतर तो बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
मनीष शंकर अल्लम इकबाल असे या तरुणाचे नाव असून बिहार शरीफ इथे ब्रिलियंट कॉन्व्हेंट स्कूल येथे त्याचे परीक्षेचे केंद्र होते. नटून थटून पेपर देण्याच्या उद्देशाने तो परीक्षा केंद्रावर पोहोचला मात्र तिथे त्याला एकही तरुण आढळला नाही मात्र तब्बल 500 तरुणी पेपर देण्याच्या उद्देशाने तिथे आलेल्या होत्या. वर्गात पाचशे तरुणींच्यामध्ये बसून आपल्याला पेपर लिहायचा आहे या कल्पनेनेच त्याला घाम फुटला त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.