लग्नानंतर अनेक जण हनिमूनसाठी म्हणून महाबळेश्वर येथे जातात तर मुंबई परिसरातील नागरिक प्रतिमहाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या कर्जत तालुक्यातील माथेरान येथे देखील जातात. तिथे गेल्यानंतर घोड्यावर बसण्याचा मोह आवरत नाही आणि घोड्यावर बसून फोटो काढण्याची देखील नवदांपत्यात मोठी क्रेझ आहे मात्र एका व्यक्तीला असा प्रकार चांगलाच महागात पडलेला असून त्यात त्यांनी प्राण गमावलेले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, 28 जानेवारी रोजी मुंबई येथील रहिवासी असलेले मोहम्मद शेख हे त्यांची पत्नी आणि इतर एका दाम्पत्यासोबत माथेरान येथे फिरायला गेलेले होते. तिथे गेल्यानंतर माथेरान परिसरात काही काळ फिरल्यानंतर घोड्यावर बसण्याचा त्यांना मोह झाला आणि घोड्यावर बसल्यानंतर घोडेस्वारी करत असताना अचानकपणे घोडा जोरात पळाला आणि त्यानंतर ते घोड्यावरून पडले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
मोहम्मद शेख हे घोड्यावर बसले आणि त्यानंतर घोडा अवघे काही पावले चालला आणि त्यानंतर तो जोरात पळू लागला. मोहम्मद शेख यांना घोड्यावर बसण्याचा याआधी काही अनुभव नव्हता त्यामुळे घोडा कशा पद्धतीने कंट्रोल करावा हे त्यांच्या लक्षात आले नाही आणि त्यानंतर ते घोड्यावरून पडले.त्यांच्या डोक्याला चांगलाच मार लागल्याने त्यांना सुरुवातीला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुखापत गंभीर असल्याने दुसऱ्या रुग्णालयात दाखवण्यात हलवण्यात आले मात्र उपचार होण्याआधी त्यांचा मृत्यू झालेला होता.