पुण्यात चक्क ‘ नासा ‘ च्या नावाने अडकवलं अन आता ..

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलेला असून अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था असलेली नासा यांच्या नावाने अनेक जणांना गंडवण्यात आलेले आहे. रेडिओॲक्टिव्ह असलेला पदार्थ राईस पुलर नावाच्या धातूत इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल असे आमिष दाखवत कोट्यावधी रुपयांना नागरिकांना पुण्यात चुना लावण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राम गायकवाड ( राहणार माळेवाडी सोलापूर), रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ ( पुणे ) आणि राहुल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून राईस पुलर नावाच्या या प्रकारात आत्तापर्यंत अनेक जणांची देशभरात फसवणूक झालेली आहे. पुण्यात आतापर्यंत 100 पेक्षा अधिक नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे या संदर्भात अर्ज दिलेले असून झालेली फसवणुक सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे दिसून येत आहे.

आरोपी यांनी संगनमत करून तक्रारदार व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढले होते आणि आपल्याकडे राईस पुलर हे धातूचे भांडे आहे त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला परतावा मिळेल असे सांगत नासाच्या नावाने चक्क बनावट कागदपत्रे देखील त्यांनी तक्रारदार यांना दाखवली होती त्यामुळे तक्रारदार यांचा विश्वास बसला. धक्कादायक बाब म्हणजे साधू वासवानी चौकात एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये देखील त्यांनी मेळावा घेतला होता त्यामुळे तक्रारदार व्यक्तींना संशय आला नाही आणि ते त्यांच्या जाळ्यात अडकत अडकत गेले अखेर एके दिवशी भ्रमाचा फुगा फुटला आणि त्यानंतर प्रकरण पोलिसात पोहोचले.


Spread the love