पुणेकरांनी चक्क त्यांना पाठलाग करूनच धरलं अन..

Spread the love

पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना शिरूर बस स्टॅन्ड इथे उघडकीला आलेले असून एका महिलेच्या पर्समध्ये 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार शिरूर एसटी स्टँडवर 27 तारखेला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेला होता. गर्दीचा फायदा उठवत आरोपींनी हा प्रकार केला मात्र नागरिकांनी सतर्कता दाखवत दोन चोरट्यांना पकडले असून एक महिला मात्र फरार झालेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संगीता सुरासे आणि त्यांचे पती रामदास सुरासे हे शिरूर इथे पुण्याला जाण्यासाठी एसटी स्टँडवर आलेले होते त्यावेळी आरोपींनी फिर्यादी महिला यांच्याकडे भीक मागण्यासाठी दोन लहान मुलांना पाठवले आणि त्यानंतर त्या बसमध्ये चढत असताना तीन जणांनी संगणमत केले आणि त्यांच्या हातात असलेली पर्स हिसकावून ते पळून गेले. फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना ताब्यात घेतले मात्र एक महिला या प्रकारात फरार झालेली आहे.

निकेश भोसले, काट्या निकेश भोसले ( दोघेही राहणार अशी शिरूर ) अशी आरोपींची नावे असून त्यांची महिला साथीदार फरार झालेली आहे. संगीता रामदास सुरासे यांनी आरोपींच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस फरार महिलेचा शोध घेत आहेत.


Spread the love