भूगोलाच्या शिक्षकाचे हिंदीच्या शिक्षिकेवर अनैसर्गीक अत्याचार , कुठं घडलाय प्रकार ?

Spread the love

देशात एक खळबळजनक असा प्रकार हरियाणातील हिसार इथे उघडकीस आलेला असून आदमपूर भागात एका कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या एका शिक्षिकेने या कॉलेजच्या प्राध्यापकावर खळबळजनक असे धक्कादायक असे आरोप केलेले आहेत. कॉलेजच्या प्राध्यापकाने एका बंद खोलीत आपल्याला पकडून आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केले असे या शिक्षिकेचे म्हणणे असून त्यानंतर महिला पोलीस ठाण्यात तिने या प्राध्यापकाच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित शिक्षिका ही कॉलेजमध्ये हिंदी विषय शिकवत असून 3 ऑक्टोबर 2017 पासून या कॉलेजमध्ये ती कार्यरत आहे. 24 जानेवारी रोजी महाविद्यालयात परीक्षा सुरू असताना ती संध्याकाळच्या ड्युटीवर होती आणि पेपरची वेळ दोन ते पाच अशी होती. परीक्षा संपल्यानंतर तिने उत्तरपत्रिका जमा केल्या त्यावेळी तिथे भूगोल विषय शिकवत असलेले अशोक बैनीवाल हे उभे होते.

अशोक यांनी तिला ड्युटी संदर्भात काहीतरी बोलायचे आहे असे सांगत 48 क्रमांकाच्या खोलीत तिला घेऊन जात एकटे पाहून दरवाजा आतून लावून घेतला. पीडित महिलेने विरोध केल्यानंतर जर तुला सुखाने येथे काम करायचे असेल तर हे सर्व करावे लागेल असे म्हणाला आणि तिचा विनयभंग केला त्यानंतर त्याने जोर जबरदस्ती करत तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले आणि वारंवार तिला एकांतात भेटण्यासाठी तो बोलावत असायचा. त्याच्या या प्रकारानंतर आपले मानसिक स्वास्थ बिघडलेले असून महिला अनुसूचित जातीची आहे त्यामुळे पोलिसांनी आरोपी विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला असून तपासाला सुरुवात केलेली आहे.


Spread the love