अशीच ‘ नागडी ‘ घराबाहेर काढेन , विवाहितेच्या घरात घुसून धमकी

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीला आलेली असून एका विवाहितेच्या घरात बळजबरीने घुसून मारहाण करत तिच्या अंगावरील कपडे फाडण्यात आले आणि ही विवस्त्र झाल्यानंतर तिला त्याच परिस्थितीत बाहेर घराबाहेर काढण्याची देखील धमकी देण्यात आली. वरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक फेब्रुवारी रोजी ही घटना उघडकीस आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राहुल दारोकार ( वय 36 राहणार वरुड ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून पीडित महिलेचे वय 27 वर्षे आहे. काही वर्षांपूर्वी आरोपीची ओळख झालेली होती त्यानंतर 31 जानेवारी रोजी रात्री ती घरात एकटीच असताना आरोपीने तिला फोन केला आणि शिवीगाळ करून मी तुझ्या घरी येतो असे म्हणत तो अचानकपणे घरात घुसला घरात. अनधिकृतपणे प्रवेश केल्यानंतर त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला आणि तिने विरोध करताच तिला विवस्रावस्थेत घराबाहेर काढण्याची धमकी दिली सोबतच आपल्याकडे असलेले सर्व अश्लील फोटो व्हायरल करेल असे देखील तो म्हणाला त्यानंतर पीडित महिलेने पोलिसात धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार नोंदवलेली आहे.


Spread the love