पुणेकर व्यावसायिकाला ‘ फाशी घेण्याचा सल्ला ‘ देत नगरमध्ये मारहाण

Spread the love

नगर येथे एक खळबळजनक घटना उघडकीला आलेली असून पुणे येथील एका व्यावसायिकाला नगर येथे आल्यानंतर बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. सदर घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून प्लास्टिकच्या साहित्याची थकबाकी वसुलीसाठी पुणे येथील एक व्यावसायिक नगर येथे आलेला होता त्यावेळी नगर येथील व्यावसायिकाने त्यास बेदम मारहाण केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, महेश विजय चंगेडिया ( विजय हिंग सप्लायर अहमदनगर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात संदीप किसन नानेकर ( मधुमती सोसायटी नांदेड सिटी पुणे ) यांनी फिर्याद दिलेली आहे. संदीप नानेकर यांची पुण्यात प्लॅस्टिक बाटल्या बनवण्याची कंपनी आहे. महेश चंगेडिया याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात माल उचललेला होता मात्र या मालाचे तब्बल 26 लाख 35 हजार रुपये चंगेडिया याने थकवलेले होते. अनेकदा त्यास विनंती करून देखील तो पैसे देत असल्याने थकबाकी वसुलीसाठी संदीप नाणेकर आणि त्यांचे मित्र अमोलकचंद खेमनसारा आणि प्रशांत मोहन आढाव हे गुरुवारी नगर इथे आलेले होते त्यावेळी त्यांनी महेश चंगेडिया याची भेट घेतली आणि पैसे देण्याची विनंती केली मात्र महेश हा त्यांच्यावर भडकला आणि त्यांच्यात वादावादी सुरू झाली.

वादावादीचे रूपांतर शिवीगाळमध्ये झाले आणि त्यानंतर तक्रारदार यांनी अखेर महेश चंगेडिया यास ‘ तू पैसे दे नाहीतर मला फाशी घ्यायची वेळ आलेली आहे ‘ असे सांगितल्यानंतर देखील चंगेडिया याच्या वागण्यात बदल झाला नाही आणि त्याने नानेकर यांना दमदाटी करत ‘ बिनधास्त फाशी घेऊन टाक. मी दोरी आणून देतो ‘. असे देखील तो म्हणाला. नगर येथे आपल्या शहरात पुण्यातून व्यावसायिक आलेले असल्याने चंगेडिया याला भलतीच मस्ती आली आणि त्याने नाणेकर यांच्या डोक्यात लोखंडी मारहाण केली त्यात ते गंभीर जखमी झाले असे फिर्यादीत म्हटलेले आहे

पुण्यातील व्यावसायिकाला नगर येथे आल्यानंतर मारहाण होत असल्याने नगरमधील काही व्यावसायिक किती मुजोर झालेले आहेत याचे हे उत्तम उदाहरण असून गेल्या काही वर्षांपासून उधार माल घेणे आणि त्यानंतर पैसे कायमस्वरूपी बुडवणे असे प्रकार व्यावसायिक क्षेत्रात सर्रास होत आहेत . वसुलीसाठी म्हणून आपल्या शहरात आल्यानंतर समोरील व्यक्तीला दुसऱ्या शहरातून आलेला आहे हे लक्षात आल्यानंतर मारहाण करणे दमदाटी करणे यामुळे शहराचे देखील नाव खराब होत असून अशा प्रकाराचा इतर व्यावसायिकांना देखील क्रेडिटवर माल घेण्यास नकारात्मक परिणाम होतो. व्यावसायिक क्षेत्रातून चंगेडिया याच्या या कृत्याची निंदा केली जात आहे.


Spread the love