पोलीस असल्याचे सांगत ‘ लग्नाचा नाद ‘ , अखेर लखोबा धरला

देशात एक खळबळजनक असे प्रकरण झारखंडची राजधानी असलेल्या रांची येथे समोर आलेले असून पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीने आपली ओळख आणि धर्म लपवून आत्तापर्यंत तब्बल सहा लग्न केलेली असून सातव्या लग्नाच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, असलम असे या पन्नास वर्षीय आरोपीचे नाव असून तो धनबादमधील भुली परिसरातील रहिवासी आहे. आपण पोलीस अधिकारी आहोत अशी बतावणी करत त्याने अनेक महिला आणि मुलींना आपल्या जाळ्यात अडकवले होते. शारीरिक संबंधाची चटक लागलेल्या या व्यक्तीने त्यासाठी चक्क सहा लग्न देखील केली मात्र सातव्यांदा लग्न करताना तो अडकला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलीस येतील हे लक्षात येतात त्याने लग्नाच्या मांडवातून पलायन केले होते मात्र त्याला जेरबंद करण्यात आले.

डीएसपी कुलदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी देखील त्याच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते त्यानंतर त्याला रांची येथून अटक करण्यात आलेली असून एका अल्पवयीन मुली सोबत लग्न करून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा गुन्हा त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे. आदिवासी समाजातील आणि अल्पसंख्यांक समाजातील महिलांसोबत आपला धर्म लपवत तो विवाह करायचा आणि त्यानंतर काही दिवसात शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर पळून जायचा अशी देखील माहिती समोर आलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या विरोधात रांची, धनबाद, तोफतांची इथे अनेक खटले प्रलंबित असून पैशाचे अमीष दाखवत तो हा प्रकार करत होता. 2021 मध्ये एका प्रकरणात तो तुरुंगात देखील जाऊन आलेला असून जामिनावर सुटल्यानंतर देखील त्याच्या वर्तणुकीत बदल होत नव्हता असे सांगण्यात आलेले आहे.