हनीमूनच्या रात्री नववधूचाच ड्रेस घालून पती तयार , विवाहिता म्हणतेय तो..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून मुंबई येथील ही घटना आहे. एका महिलेने आपला पती हा चक्क नव्या नवरीसारखा नटून रात्री आपल्यासोबत झोपतो असे या महिलेचे म्हणणे असून पीडित महिलेचे वय वीस वर्षे आहे. आपला नवरा हा पुरुष नाही असे या महिलेचे म्हणणे असून त्याचा हा प्रकार झाकण्यासाठी सासरच्या मंडळींनी चक्क आपण गर्भवती असल्याची आवई उठवली आणि त्यानंतर मी निष्काळजीपणा केला म्हणून माझा गर्भपात झाला अशी देखील आवई त्यांनी उठवली असे पीडित महिलेचे म्हणणे आहे.

महिलेच्या म्हणण्याप्रमाणे, मी आणि माझा पती यांच्या लग्नानंतर कधीच शारीरिक संबंध आलेले नाही त्यामुळे मी गर्भवती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपली फसवणूक करण्यात आलेली असून पती आणि सासरच्या मंडळींच्या विरोधात होणार नोंदवण्यात यावा असे आपले म्हणणे आहे. आपण घाटकोपर येथील रहिवासी असून कोल्हापूर शहरातील एका तरुणासोबत आपला विवाह झालेला होता. आपली आर्थिक परिस्थिती नाजूक असून देखील कुटुंबीयांनी पदरमोड करून 2021 ला आपला विवाह या तरुणासोबत लावून दिलेला होता. लग्नाच्या रात्री आपला पती याने आपण उतरवलेले नववधूचे कपडे स्वतःच्या अंगावर चढवले आणि त्यानंतर तो बेडवर तसाच रात्रभर झोपी गेला असे म्हटलेले आहे.

पीडित महिला पुढे म्हणते की, ‘ लग्नाच्या रात्रीच हनीमूनच्या वेळी त्याने नववधूची वेशभूषा केली. लग्नाच्या दिवशी मी आणलेली ब्युटी पार्लर किट त्याने वापरली आणि त्याच पद्धतीने स्वतःचा मेकअप केला. माझ्याजवळ जेव्हा तो झोपण्यासाठी आला त्यावेळी मी सासूला या प्रकाराबद्दल सांगितले त्यावेळी सासुने त्याची जुनीच सवय आहे असे सांगत प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर मी आई-वडिलांकडे हा प्रकार सांगितला तेव्हा सासरच्या व्यक्तींनी आपला छळ सुरू केला. धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसातच त्यांनी आपण गर्भवती राहिलेलो आहोत अशी देखील आवई परिसरात पसरवली आणि त्यानंतर आपला गर्भपात झाला असे देखील त्यांनी सर्वांना सांगितले. जर आमच्या शारीरिक संबंध झालेलेच नाही तर गर्भपात कसा होऊ शकतो ? असा देखील संतप्त सवाल या महिलेने उपस्थित केलेला आहे.

सदर प्रकाराबद्दल आपण आपल्या पतीला जाब विचारला असता त्याने आपल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने लैंगिक अत्याचार केले. आपल्या छातीवर बसून त्याने मारहाण केली तसेच आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये त्याने स्क्रू ड्रायव्हर आणि इतर काही गोष्टी घातल्या त्यामुळे इन्फेक्शन होऊन अखेर डॉक्टरकडे जाण्याची मला वेळ आली. कुटुंबीयांना मी यासंदर्भात माहिती दिली मात्र त्यांनी पोलिसात न जाण्याचा सल्ला दिला. पतीकडून सातत्याने छळ होत असल्याने कोल्हापुरातील सदर बाजार पोलिसात संपर्क साधला मात्र पोलिसांकडून देखील आपल्याला निराशाच हाती आली. आपले सासरे श्रीमंत असल्यामुळे पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाही अशी देखील खंत या महिलेने व्यक्त केलेली आहे.

काही दिवस उलटल्यानंतर आपण हा प्रकार आईच्या कानावर घातल्यानंतर आईची या प्रकरणाबद्दल खात्री पटली आणि त्यानंतर आईने आपल्याला साथ देण्यास सुरू केले. पीडित महिलेच्या आईच्या म्हणण्यानुसार, आम्ही आमच्या मुलीचे लग्न मोठ्या आशेने केलेले होते. मुलाला देखील आम्ही आधी भेटलो त्याच्या देखील वर्तनात आम्हाला काही संशयास्पद वाटले नाही असे म्हटलेले आहे तर दुसरीकडे सासरच्या मंडळींकडून ही महिला खोटे बोलत आहे असे सांगण्यात आलेले आहे.


Spread the love