महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना नागपूर येथे समोर आलेली असून दारूच्या नशेत एका व्यक्तीने चक्क स्वतःच्या आईची हत्या केल्याचा प्रकार घडलेला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या मुलाला अटक केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विमलाबाई संतराम काटेकर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून गोविंद संतराम काटेकर असे आरोपी मुलाचे नाव आहे. आरोपी गोविंद याला दारूचे व्यसन होते आणि तो कुठलाही काम धंदा करत नसल्याने तसेच दारूसाठी पैसे लागत असल्याने सतत त्याची आई हिच्याकडे पैशाची मागणी करायचा. आईने पैसे दिले नाही तर तो त्यांना चक्क मारहाण देखील करत होता.
रविवारी संध्याकाळच्या सुमारास अशाच पद्धतीने त्याने आईला पैसे मागितले आणि त्यानंतर त्याने घरात ठेवलेल्या विळ्याने आईवर सपासप वार केले त्यामध्ये त्याची आई विमलाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला बेड्या ठोकलेल्या असून झाल्या घटनेबद्दल परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.