महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना सातारा जिल्ह्यात वाई परिसरात उघडकीस आलेली असून खानापूर येथील एका मोलमजुरी करणाऱ्या युवकाचा परखंदी गावात खून करण्यात आलेला आहे. शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडलेली असून त्या घटनेचा निषेध म्हणून गावात कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. रहीम रसूल मुलाणी याच्यासोबत मयत तरुण जाताना दिसून आला होता .
संशयित आरोपी असलेला रहीम रसूल मुलाणी (वय २० रा.खानापूर ता.वाई) आणि त्याचे दोन मित्र फरार असून मोबाईल लोकेशनद्वारे त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर वातावरण निवळले. मात्र, गावात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. संशयित रहीम मुलाणी याच्यावर वाई पोलीस ठाण्यात देखील एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
अभिषेक रमेश जाधव वय 20 असे मयत तरुणाचे नाव असून त्याच्याजवळ असलेल्या कागदपत्राच्या आधारे त्याच्या त्याची ओळख पटवण्यात आली. खानापूर येथील रहिवासी असलेला रहीम रसूल मुलाणी त्याला भेटण्यासाठी आला होता त्यानंतर त्याने त्याला परखंदी परिसरात बोलावून घेतले आणि त्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला.
मयत अभिषेक हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता त्याच्या पश्चात त्याचे आई आणि लहान बहिण असून त्याचा मृतदेह गावात आणला त्यावेळी आई आणि लहान बहिणीने हंबरडा फोडला. खानापूरमध्ये यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झालेले असून ग्रामपंचायतीने तात्काळ ग्रामसभेचे आयोजन करत दोषी व्यक्तींवर कडक कारवाईची मागणी केलेली होती. अभिषेक याचे गावातील एका तरुणीशी प्रेम संबंध होते त्याला कुटुंबीयांचा विरोध असल्याने त्यांना दोघांनाही समजावून टाकण्यात आलेले होते मात्र मुलींच्या व्यक्तींकडून हा राग गेलेला नव्हता त्यामुळे त्यातून हा खून झाला असल्याची शक्यता वर्तवली जात होती अखेर ती बाब खरी ठरली आहे .