पुणेकर आजोबांवर तरुणीचा ‘ फासा ‘ परफेक्ट बसला , रक्कम इतकी की..

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून डेटिंग सर्विस देण्याच्या नावाखाली दोन व्यक्तींनी पुण्यातील एका 78 वर्षीय आजोबांची फसवणूक केलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे फसवणुकीचा आकडा हा किरकोळ नसून तब्बळ एक कोटी दोन लाख रुपयांचा आहे. सदर प्रकरण उघडकीला आल्यानंतर पोलिसांनी दोन जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रजत सिन्हा, नेहा शर्मा आणि ज्या व्यक्तींच्या खात्यात हे पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला असून हा प्रकार मे 2022 पासून सुरू होता. फिर्यादीत घे सुखवस्तू कुटुंबातील असून एका मोठ्या कंपनीतून निवृत्त झालेले होते. त्यांच्या पत्नीचे निधन झालेले असताना ते एकाकी पडलेले होते त्यावेळी त्यांना नेहा शर्मा नावाचा एका महिलेचा फोन आला आणि आपली डेटिंग कंपनी आहे तिथे तुम्हाला ऑनलाईन मैत्रीसाठी तरुणी आणि महिला उपलब्ध करून देऊ असे सांगण्यात आलेले होते.

सुरुवातीला रजिस्ट्रेशन करण्यासाठी म्हणून त्यांना काही रक्कम ऑनलाइन भरण्यास सांगितली आणि त्यानंतर वेगवेगळी कारणे देत त्यांच्याकडून तब्बल एक कोटी दोन लाख रुपये लुटण्यात आले. तक्रारदार यांनी म्हटल्याप्रमाणे या महिलेने ,’ मी तुमच्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे’, असे देखील त्यांना सांगितले होते आणि त्यानंतर त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले मात्र ती महिला प्रत्यक्षात कधीच समोरही आली नाही मात्र गोड बोलून तिने त्यांच्याकडून पैसे लुबाडले असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. सातत्याने तिची पैशाची मागणी थांबत नसल्याने अखेर सायबर पोलिसांकडे धाव आजोबांनी धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून तपासाला सुरुवात केलेली आहे.