महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून जिच्यासोबत सुखी संसाराची स्वप्ने रंगवली तिचेच शेजाऱ्यासोबतच प्रेमसंबंध जुळले. तिला अनेकदा समजावून देखील तिच्या वागण्यात बदल झाला नाही यानंतर हतबल झालेल्या पतीने तिच्या प्रियकराला देखील यासंदर्भात सांगत आमच्या संसारात विघ्ने आणू नकोस अशी विनंती केली मात्र त्याने देखील आमच्यामध्ये तुम्ही पडू नका असा सल्ला दिल्याने हा पती हतबल झालेला होता.
आपल्या पत्नीला आपण सातत्याने विनंती करत आहोत आणि ती प्रियकरासोबतचे संबंध काहीही करून सोडण्यास तयार नाही हे लक्षात आल्यानंतर अखेर पतीने गावाकडे आल्यावर बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या आहे. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर परिसरातील हा ही घटना असून अशोक दत्तराव भिसे ( वय ३५ राहणार जरोडा तालुका कळमनुरी ) असे मयत व्यक्तीचे व्यक्तीचे नाव असून त्यांची पत्नी दुर्गा अशोक भिसे आणि तिचा प्रियकर यांच्या शंकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मयत अशोक दत्तराव भिसे याचे लग्न गावाशेजारील येलकी गावातील दुर्गा नावाच्या मुलीसोबत २००७ मध्ये झाले. त्यानंतर दोन मुली व एक मुलगा अशी तीन अपत्य देखील झाली. कामानिमित्ताने ते औरंगाबाद येथे बजाजनगर येथे भाड्याने राहत असताना शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत पत्नीचे संबंध प्रस्थापित झाले. पतीने सदरील बाब आई, भाऊ, सासू-सासरे यांच्या कानावर घातली आणि तिला नीट राहण्याबाबत समज दिली. परंतु तिच्या वर्तनात काही सुधारणा झाली नाही आणि अखेर पतीनेच गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे.