पुण्यात एक खळबळजनक प्रकार वाघोली परिसरात उघडकीस आलेला असून वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या तळ्यात एका 19 वर्षीय तरुणाने आई रागावली म्हणून आत्महत्या केलेली आहे. चार तारखेला हा प्रकार उघडकीला आलेला असून सदर घटनेनंतर परिसरात शोककळा पसरलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पवन शिवाजी मगरे ( वय १९ राहणार विमान नगर ) असे मयत तरुणाचे नाव असून आई रागावली म्हणून तो पुणे नगर हायवेच्या संरक्षण भिंतीवरील जाळीवरून उडी मारून तळ्याजवळ आलेला होता. तिथे आल्यानंतर तो बराच वेळ झाडाखाली बसला त्यावेळी त्याने एकाचा फोन घेऊन आईला फोन लावला मात्र आईने फोन उचलला नाही पुन्हा त्याने आईला फोन केला मात्र तरी देखील आई फोन उचलत नाही त्यामुळे त्याने अखेर तळ्यात उडी मारून आत्महत्या केली.
सदर घटनेची परिसरातील नागरिकांनी तात्काळ माहिती पोलिसांना दिली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत तो बुडून गेलेला होता. अग्निशामक दल आल्यानंतर त्यांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. वाघोली पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी तात्काळ धाव घेतलेली होती.