आत्महत्येसाठी उडी मारली अन पडला महिलेच्या ताटात , महिला ऍडमिट तर..

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एका आत्महत्येची जोरदार चर्चा असून नवी दिल्ली येथे हे प्रकरण आहे. नोएडा सेक्टर 168 इथे ही घटना घडलेली असून गोल्डन फार्म सोसायटी येथील एका विसाव्या मजल्यावरून एका व्यक्तीने उडी मारली त्यानंतर तो जमिनीवर पडणे अपेक्षित होते मात्र तो इमारतीच्या खाली असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये महिला जेवणासाठी आलेली होती तिच्या ताटात पडला त्यामुळे ही महिला देखील जखमी झालेली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, नमन मदन असे या व्यक्तीचे नाव असून या घटनेत त्याचा मृत्यू झालेला आहे तर ज्या महिलेच्या ताटात तो पडला ती देखील गंभीर जखमी झालेली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. चंदीगड इथून तो एका तरुणीसोबत दिल्ली येथे आलेला होता. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर असून काही दिवसांसाठी त्याने एक फ्लॅट भाड्याने घेतला होता त्यात ही तरुणी आणि तो या फ्लॅटमध्ये राहत होते.

सदर तरुणी आणि नमन हे गुरुवारी एकत्र फ्लॅटवर आले आणि सोबत दारू प्याले. दारू पिल्यानंतर त्यांच्यात भांडण झाल्यावर खोलीमधून ती बाहेर पडत होती त्यावेळी नमन याने बाल्कनीमधून उडी मारली त्यावेळी तो रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आलेल्या महिलेच्या ताटात पडला. अचानकपणे हा प्रकार घडल्याने या महिलेला देखील मोठी इजा झालेली असून ती देखील रुग्णालयात दाखल आहे. नमन याच्या सोबत असलेली महिला तरुणी ही त्याची वर्ग मैत्रीण असून पोलिसांनी तिला ताब्यात घेत प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केलेली आहे.


Spread the love