सोशल मीडियावर सध्या एका महिलेची चांगलीच दहशत असून उत्तर प्रदेशातील रामपूर परिसरात मिलक नावाच्या गावात हा प्रकार उघडतील आलेला आहे. सदर महिला ही रात्रीच्या वेळी कपडे काढून लग्न अवस्थेत फिरण्यास सुरू करते आणि बंद असलेल्या घराच्या दारावर टकटक असे वाजवते. तिच्या आवाजाने नागरिकांची झोप मोड तर होतेच मात्र त्यांच्यामध्ये भीती देखील निर्माण झालेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, 29 जानेवारी रोजी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही नग्न महिला कैद झालेली असून तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. गेल्या आठवड्यापासून रात्री एक वाजता ती बाहेर पडते अन पहाटे चार वाजेपर्यंत तिचा हा नंगानाच परिसरात सुरू असतो. स्थानिक रहिवासी सीमादेवी यांनी तिच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे.
सीमा देवी यांनी तक्रारीत म्हटलेले आहे की, ‘ रात्री एक वाजून पाच मिनिटांनी एका 25 वर्षीय महिलेने आमच्या घराची बेल वाजवली. ती मला दरवाजा उघडण्यास सांगत होती मात्र मी दरवाजा उघडला नाही ‘. पोलिसांच्या वतीने या महिलेचा नेमका हेतू आणि तिच्या संदर्भात सर्व माहिती गोळा करण्यासाठी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज चेक करत असून अद्यापपर्यंत तिची ओळख पटलेली नाही. ज्या कुणाला ही महिला सर्वप्रथम दिसेल त्यांनी पहिल्यांदा तिला वस्रे द्यावीत आणि त्यानंतर जवळच्या पोलिस स्थानकाला किंवा 112 नंबरवर फोन करावा असे आवाहन केलेले आहे.