शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये महिलांसोबत गैरवर्तन करण्याचे प्रकार समोर आलेले असून पायी चालणाऱ्या महिलांना छेडखानी करत शेरेबाजी करण्याचे देखील प्रकार वाढलेले पाहायला मिळत आहेत . असाच एक प्रकार पुण्यात पिंपरी इथे समोर आलेला असून एक महिला शतपावली करण्यासाठी आलेली होती त्यावेळी दुसरा व्यक्तीदेखील तिथे त्याच्या कुत्र्यासोबत फिरत होता. कुत्रा अंगावर आल्याचे पाहिल्यानंतर ही महिला भडकली त्यावेळी आरोपीने तिला अश्लील भाषेत शेरेबाजी केली.
उपलब्ध माहितीनुसार, सिंग निवृत्ती नरोटे ( वय 36 राहणार ओमसाई सोसायटी ताम्हणे वस्ती चिखली ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून फिर्यादी महिला त्यांच्या मुलीसह शनिवारी रात्री दहाच्या सुमारास शतपावली करत होत्या त्यावेळी आरोपी त्याच्या कुत्र्यासह तिथे आला आणि त्याच्याकडे असलेला कुत्रा फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेला. फिर्यादी यामुळे घाबरून गेल्या आणि त्यांनी त्याला कुत्र्याला नीट सांभाळा असे म्हटल्यानंतर आरोपी व्यक्तीने त्यांना ‘ चावला का तुला कुत्रा ? ‘ असे म्हणत अश्लील भाषेत त्यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्या शरीराला स्पर्श केला असे तक्रारदार यांचे म्हणणे असून चिखली पोलिसांनी याप्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.