गेल्या काही वर्षांपासून खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून खंडणी वसुलीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार मुंबई येथे समोर आलेला आहे. मुंबई पोलिसांनी तब्बल आठ वर्षांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून एका महिलेला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. कस्तुरबा पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे.
तक्रारदार व्यक्ती हे भाडेतत्त्वावर एक हॉटेल चालवत असून त्यांची ओळख प्रियंका वैद्य नावाच्या एका महिलेसोबत झालेली होती. काही दिवस त्यांच्यात मैत्री देखील होती मात्र त्यानंतर बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची त्यांना धमकी देण्यात आली आणि आरोपी महिला आणि तिचा साथीदार असलेला राजू पुजारी यांनी तक्रारदार व्यक्ती यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. प्रियंका हिची साथीदार असलेली पिंकी थापा हिने देखील अनेकदा तक्रारदार यांना धमकावत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे तक्रारदार व्यक्ती यांचे म्हणणे आहे.
आपण या व्यक्तींना बोरिवली कोर्ट येथील पहिल्या मजल्यावर एकदा तीन लाख 28 हजार रुपये दिले आहेत असे तक्रारदार व्यक्ती यांनी सांगितलेले असून दुसऱ्या एका प्रकरणात आरोपी प्रियंका वैद्य हिला अटक करण्यात आलेली होती त्यावेळी तिचे नाव पेपरमध्ये आलेले पाहिले आणि त्यानंतर आपल्याला तिच्या विरोधात तक्रार देण्याची हिंमत झाली असे त्यांनी सांगितलेले आहे . आत्तापर्यंत ती आणि तिच्या टोळक्याला घाबरून आपण गप्प होतो असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.