मतिमंद मुलाच्या शोधात पायी फिरण्याची माऊलीवर वेळ , महाराष्ट्रातील प्रकरण

Spread the love

सोशल मीडियात सध्या घरातून गायब झालेल्या एका तरुणाची जोरदार चर्चा असून गरीब कुटुंबातील त्याची आई त्याचा सर्वत्र शोध घेत आहे. गेल्या दीड महिन्यापासून हा तरुण गायब झालेला असून पोलिसांकडे गेल्यानंतर पोलीस केवळ ‘ तपास सुरू आहे ‘ इतकीच माहिती देत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील हे प्रकरण असून मुलाच्या शोधार्थ या आईने अंगावरील सर्व दागिने विकले. घरातील पैसे खर्च केले मात्र तरीही मुलगा सापडत नसल्याने अखेर ही माऊली पायदळी आपल्या मुलासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिरत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रुखमाबाई गंगाराम वगारहांडे ( वय 55 वर्ष ) असे या माऊलीचे नाव असून त्यांचा तीस वर्षीय मतिमंद असलेला मुलगा किशोर हा 16 डिसेंबर रोजी घरातून गायब झालेला आहे. त्याचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर तो आढळून आला नाही म्हणून अखेर पोलिसात देखील त्यांनी तक्रार दाखल केली मात्र पोलिसांकडून अद्यापदेखील केवळ तपास सुरू आहे इतकेच उत्तर ऐकायला मिळत आहे. हतबल झालेल्या रुखमाबाई यांनी त्यानंतर स्वतः त्याच्या तपासासाठी पुढाकार घेतला आणि प्रत्येक शहरात आणि ठिकठिकाणी जिथे शक्य असेल तेथील मंदिर, मशीन, गुरुद्वार या ठिकाणी देखील त्या पोहोचत आपल्या मुलाचा त्या शोध घेत आहेत .

किशोर लहान असताना त्यांच्या पतीचे निधन झाले होते त्यानंतर त्यांनी धुणीभांडी करत किशोर आणि त्याच्या बहिणीला लहानचे मोठे केले. दरम्यानच्या काळात तो मतिमंद असल्याचे लक्षात आल्यानंतर देखील त्यांनी त्याच्या देखभालीत कुठली कमतरता ठेवली नाही. त्यांच्या मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलींच्या मुलाला देखील मानसिक आजार झाला त्यानंतर रुखमाबाई यांनी मुलीचा मुलगा आणि किशोर यांची देखभाल सुरू केली मात्र दीड महिन्यापूर्वी किशोर गायब झाला तो अद्यापपर्यंत आढळून आलेला नाही. नागरिकांना आपला मुलगा कुठेही दिसला तरी यवतमाळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आव्हान त्यांनी केलेले आहे.


Spread the love