त्यानंतर प्रेयसी ‘ मुद्दसीर ‘ सोबत दिसू लागली , बनवला असा प्लॅन अन..

Spread the love

मुंबईत एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून आपली प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत फिरत असल्याच्या रागातून एका प्रियकराने त्याच्या साथीदाराच्या मदतीने तिच्या मित्राची अत्यंत अमानुषपणे हत्या केलेली आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना बेड्या ठोकलेला असून चेंबूर येथील हे प्रकरण आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मुद्दशीर शेख ( वय 19 ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून तो चेंबूर परिसरातील राहणारा आहे. परिसरात राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीसोबत आरोपी असलेला आदित्य याचे प्रेमसंबंध होते काही काळानंतर त्यांच्यात वितुष्ट आले आणि त्यानंतर ही तरुणी मुद्दशीर याच्यासोबत त्याला दिसू लागली.

आदित्य याला या प्रकरणाचा राग आला आणि त्याने त्याचा मित्र असलेला खलखम सय्यद याला सोबत घेतले. आदित्य आणि दुसरा आरोपी यांनी मुद्दशिर याला चेंबूरच्या सिंधी सोसायटी परिसरात गाठले आणि त्यानंतर त्याच्यावर वार केले त्यामध्ये मृत्यू झाला. भर दिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोनही आरोपींना ताब्यात घेतलेले आहे.


Spread the love