‘ आई वीस लाख जमव माझा फोन बंद होईल ‘ , शहरातून डिलिव्हरी बॉयचे अपहरण

Spread the love

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सावकाराच्या त्रासाला वैतागून आत्महत्याची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. असाच एक प्रकार पुन्हा एकदा नाशिक शहरात समोर आलेला असून एका आईने आपल्या मुलाच्या अपहरण प्रकरणी नाशिक पोलिसात फिर्याद दिलेली आहे.उपनगर पोलिसांनी दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ज्ञानेश्वर पाटील आणि यशवंत बागुल अशी आरोपींची नावे असून संदीप पाटील नावाच्या एका तरुणाचे अपहरण करण्यात आलेले होते . नाशिकच्या बोधलेनगर परिसरात संदीप पाटील हा राहत असून 2021 मध्ये तो जमीन खरेदी विक्रीचे काम करायचा त्यामुळे त्याचे व्यवहार काही जणांसोबत झालेले होते.त्याने या व्यवहारासाठी काहीजणांकडून पैसे घेतले होते मात्र त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्याला हे पैसे परत अपयश येत होते. सध्या तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून पैसे मागणाऱ्या व्यक्तींनी त्याच्याकडे गेल्या अनेक महिन्यांपासून तगादा सुरू केलेला होता.

संदीप पाटील याला पळवून आरोपी धुळे येथे घेऊन गेले असल्याचा आरोप त्याच्या आईने केलेला असून संदीप यांनी शेवटचा घरी फोन केला त्यावेळी आईला ‘ काहीही करून वीस लाख रुपये जमा करून ठेव हे लोक माझी प्रॉपर्टी मागत आहेत आणि मला घेऊन जात आहेत . माझा फोन बंद होणार आहे ‘ असा असे तो म्हणाला असा दावा आईने केलेला आहे. संशयित आरोपी खाजगी सावकार असल्याचा आरोप कुटुंबाने केलेला आहे.


Spread the love