महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात उघडकीला आलेली असून ‘ आई माझं चुकलं ‘ असा मेसेज करत एका बारावीच्या विद्यार्थ्यांनीने तिच्या आजीच्या घरी स्वतःच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. तुमसर तालुक्यातील हसारा जिथे ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, तनिष्का उर्फ निधी जितेंद्र पाटील ( वय 18 राहणार हसारा टोली ) असे मयत विद्यार्थीनीचे नाव असून तुमसर येथील एका विद्यालयात ती बारावी सायन्स शिकत होती. तिच्या वडिलांचे याआधीच निधन झालेले असल्याने ही तिच्या आजीकडे शिक्षणासाठी राहत होती. सध्या बारावीचे प्रॅक्टिकल सुरू असल्याने ती नियमितपणे कॉलेजला देखील जात होती.
रविवारी रात्रीच्या सुमारास तिने कामठी इथे राहणाऱ्या तिच्या आईला ‘ आय एम सॉरी लव यू मम्मी ‘ असा मेसेज केला आणि मध्यरात्रीच्या सुमारास पंख्याला ओढणीने गळफास बांधत आत्महत्या केली. सकाळी सात वाजता तनिष्का का उठली नाही म्हणून मावशी आणि आजी यांनी खोलीत डोकावून पाहिले त्यावेळी तिने गळफास घेतलेला होता. तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापपर्यंत समोर आलेले नसून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.