देशात एक खळबळजनक अशी घटना उत्तर प्रदेशातील संबळ जिल्ह्यात समोर आलेली असून एका व्यक्तीसोबत जो काही फसवणुकीचा प्रकार घडलेला आहे तो भयानक विचित्र आहे. वराच्या म्हणण्यानुसार वधू पक्षाने आपल्याला मुलगी पाहायला गेलेलो होतो त्यावेळी लहान मुलगी दाखवली म्हणून आपण हो म्हटले मात्र लग्नाच्या वेळी प्रत्यक्षात मोठी मुलगी उभी केली. तिच्या डोक्यावरील पदर काढला त्यावेळी जिच्यासोबत आपल्याला लग्न करायचे होते ती ही नव्हेच हे आपल्या लक्षात आले. जिच्यासोबत आपले लग्न लावलेले आहे ती मनोरुग्ण असल्याचा देखील दावा या वराकडून करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कटोरी गावातील ही घटना असून 26 जानेवारी रोजी धुमधडाक्यात हा विवाह पार पडलेला होता. घराण्यातील विधीनुसार व वधूने डोक्यावर पदर घेत स्वतःचा चेहरा लपवून ठेवला. आपल्यासोबत सात फेरे देखील घेतले आणि आपल्याला साता जन्माची साथ देण्याचे वचन देखील दिले. लग्न सोहळा झाल्यानंतर सासरी आल्यावर जेव्हा मुंहदिखाई हा कार्यक्रम सुरू झाला त्यावेळी वराकडील व्यक्तींनी तिच्या डोक्यावरील पदर काढला त्यावेळी जिच्यासोबत लग्न ठरलेले होते ती ही तरुणी नव्हेच हे त्यांच्या लक्षात आले.
वराच्या कुटुंबीयांनी लहान बहिणीला आमच्या मुलाने पसंत केलेले होते आणि त्यानंतर तसे बोलणे देखील झालेले होते मात्र प्रत्यक्षात लग्नाच्या दिवशी थोरल्या बहिणीला उभे करण्यात आले असा आरोप केलेला आहे जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपण आत्महत्या करू असा देखील इशारा या नवरदेवाने दिलेला असून पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.