उच्चशिक्षित प्राध्यापिकेचा औरंगाबादला राहत्या घरी गळफास

Spread the love

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना औरंगाबाद इथे समोर आलेली असून दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका उच्च शिक्षित 30 वर्षीय महिलेने आत्महत्या केलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळी ती महिला गर्भवती असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे . गारखेडा येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात त्या अध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. राहत्या घरी त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजता हा प्रकार केला.

उपलब्ध माहितीनुसार, वर्षा दीपक नागलोत ( वय तीस वर्ष गारखेडा परिसर ) असे महिला यांचे नवा असून त्या सात महिन्याच्या गर्भवती होत्या. 2012 साली त्यांची त्यांच्या नात्यातील असलेला दीपक नागलोक याच्यासोबत मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू झाले. नात्यातील व्यक्ती आपल्या कारणाने लग्नाला फारसा घरातूनही विरोध झाला नाही . दीपक सध्या खाजगीत कंत्राटदार म्हणून कार्यरत असून त्यांना याआधी एक आठ वर्षाचा मुलगा आहे तर आत्महत्या केली त्यावेळी त्या सात महिन्यांच्या गरोदर होत्या.

इलेक्ट्रॉनिक्स आणि केमिकल विषयात त्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या . शुक्रवारी संध्याकाळी एमआयटी कॉलेजवरून त्या ड्युटीवर आल्या त्यानंतर त्यांनी बेडरूममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेमविवाह असल्याकारणाने सासरी असलेल्या अडचणी त्या कधीच घरी सांगत नव्हत्या. गुरुवारी त्यांच्यात घरात कसला तरी वाद झालेला होता तेव्हा त्यांच्या सासूने माहेरी फोन करत वर्षांने काही माहिती सांगितली आहे का ? असे तिच्या वडिलांना विचारलेले होते. आपल्या मुलीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे असा आरोप वर्षांच्या वडिलांनी केला असून घटनेची पोलिसात नोंद करण्यात आलेली आहे.


Spread the love