शारीरिक संबंध ठेवण्यास पती ‘ असमर्थ ‘ , महिला चंदननगर पोलिसात

Spread the love

पुण्यात एक अजब असा प्रकार समोर आलेला असून लग्नाला आठ महिने झाल्यानंतर देखील नवरा पत्नीजवळ झोपत नसल्याने बायकोने त्याला जाब विचारला त्यावेळी त्याने मला शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छाच होत नाही असे तो सतत सांगत होता. लग्नाला आठ महिने झाल्यानंतर आपला पती शारीरिक संबंध ठेवण्यासाठी असमर्थ असल्याची माहिती लक्षात आल्यानंतर महिलेने अखेर चंदननगर पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याबद्दल पती आणि सासू-सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

फिर्यादी महिला तीस वर्षांची असून जून 2022 मध्ये तिचा पुण्यातील एका तरुणासोबत विवाह झालेला होता. मुलाचे बोलणे आणि वागणे सामान्य असल्याने कुटुंबीयांना देखील काही संशय आला नाही मात्र लग्नानंतर पहिल्याच रात्री या महिलेचा पती तिच्याजवळ झोपला नाही तर घरात दुसरीकडे जाऊन झोपला. तक्रारदार महिलेला यावेळी संशय आला नाही मात्र तब्बल आठ महिने झाले तरी तो तिला हात देखील लावत नव्हता आणि तिने काही विचारले तर मला शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा नाही असे देखील तो सांगायचा. आपला पती शारीरिक संबंध ठेवण्यास समर्थ आहे हे आठ महिन्यांनी पीडित महिलेच्या लक्षात आले.

महिलेच्या म्हणण्यानुसार आपण सासू-सासऱ्यांना ही बाब सांगितली त्यावेळी त्यांनी या प्रकरणाची कुठेही वाच्यता करू नको असे म्हणत आपल्याला वेळोवेळी धमकावले आणि मारहाण देखील केली. आपल्याला पतीने उपाशी देखील ठेवले असे तिने म्हटलेले असून अखेर चंदननगर पोलीस ठाण्यात पती सासू आणि सासरे यांच्याविरोधात तिने तक्रार दिलेली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.


Spread the love