‘ तुझ्यासाठी मी स्पेशल गिफ्ट घेऊन येतेय फक्त … ‘, युवक भुलला अन तिथंच

Spread the love

देशात फसवणुकीचे अनेक नवीन नवीन प्रकार उघडकीस येत असून देखील लोकांचे डोळे काही उघडत नाहीत. अशीच एक घटना समोर आलेली असून एका मॅट्रिमोनिअल साईटवर लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणीने तरुणाची चांगलीच फसवणूक केली आहे. सदर युवकाला तब्बल 5 लाख 78 हजार रुपयांना तिने चुना लावला आहे मात्र पोलिसांनी देखील छडा लावत आरोपींना जेरबंद केले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, आरोपींनी मॅट्रिमोनियल साइटवर लग्नाचं आमिष दाखवून फरीदाबाद येथील एक निवासी अमरीक यांना आपल्या जाळ्यात ओढले . अमरिक यांची मॅट्रिमोनियल साइटवर एका तरुणीसोबत भेट झाली होती. तिने तरुणाला खोटी माहिती देत आपण नेदरलँड देशातील अॅमस्टडँम शहरातील असल्याचं सांगून त्याच्याशी मैत्री केली व प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं.

फक्त तुम्हाला भेटण्यासाठी मी भारतात येणार आहे आणि येताना तुमच्यासाठी गिफ्ट देखील घेऊन येणार आहे असे सांगत तिने युवकाला भुलवले. काही दिवसांनी आरोपी तरुणीने फोन केला की, ती तब्बल 88 लाखांचं सामान घेऊन येत होती आणि एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी तिला पकडलं आहे. यानंतर अमरीकची आरोपींपैकी एका सदस्यासह कस्टम अधिकारी म्हणून युवतीने बोलणं करवून दिलं. कस्टर अधिकाऱ्यांना कागदोपत्री कामासाठी 5 लाख 78 हजाप रुपये भरावे लागणार असल्याचं सांगितलं. युवक त्याला फसला आणि त्यांनी सांगितलेल्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रांसफर केले मात्र ना ती युवती आली ना तिचे गिफ्ट. आपल्याला चुना लावल्याचे लक्षात आल्यावर फसलेल्या युवकाने पोलिसात फिर्याद दिली.

फिर्याद दाखल होताच पोलिसांनी एका टीमचं गठण करून आरोपींचा शोध सुरू केला आणि अखेर या टोळीतील चार सदस्यांना अटक करण्यात आली. चार सदस्यांची नावं चिनोतो रॉय अकाता,अजय, आतिफ अली व एका महिला आरोपीचा समावेश आहे. आरोपी चिनोंतो रॉय अकाता नायजेरियन आहे. सर्व आरोपी दिल्लीत राहत होते. आरोपींच्या बँक खात्यातून गेल्या 6 महिन्यात तब्बल 60 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचं दिसून आले आहे सोबतच आरोपींनी गाजियाबाद, नोएजा, अहमदाबाद, गुरुग्राम येथील काही भागांमध्ये अशा प्रकारची फसवणूक केल्याचंही समोर आलं आहे.


Spread the love