पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार कोंढवा परिसरात समोर आलेला असून युनिट पाच गुन्हे शाखेने एका व्यक्तीला ताब्यात घेतलेले आहे. सदर व्यक्ती हा हातात सुरा घेऊन गुन्हा करण्याच्या उद्देशाने निघाला होता मात्र कोंढवा पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत बेड्या ठोकलेल्या आहे. लक्ष्मीनगर कोंढवा इथे तो उभा होता याचवेळी पथकाने त्याला जेरबंद केले.
उपलब्ध माहितीनुसार, सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून अरबाज उर्फ लॅब इलियाज खान ( वय 24 वर्ष राहणार आश्रफ अली रोड कोंढवा ) असे आरोपीचे नाव असून त्याने आपल्या पत्नीला त्रास देणारा एक इसम याला मारण्यासाठी प्लॅन केलेला होता त्यासाठी त्याने एक सुरा देखील खरेदी केला आणि त्याचा खून करण्याच्या उद्देशाने तो कोंढवा परिसरात उभा होता.सहा तारखेला युनिट पाच गुन्हे शाखेला या संदर्भात माहिती मिळाली आणि त्यांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला त्यानुसार त्याला अटक करण्यात आलेली असून याआधी देखील आरोपीच्या विरोधात खुनाचा प्रयत्न , जबरी चोरी , मारहाण , दंगल यासंदर्भात गुन्हे दाखल आहेत.