सोशल मीडियावर सध्या एका तरुणाच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून हा तरुण आपल्या प्रेयसीचे लग्न जमल्यानंतर डायरेक्ट तिच्या होणाऱ्या सासरच्या घरी गेलेला होता. जर तुम्ही तिला सून म्हणून घरात आणलं तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करेल अशी धमकी त्याने दिली आणि त्यानंतर सासूबाईंनी पोलिसात खबर दिली आणि या मजनूला पोलीस पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
उपलब्ध माहितीनुसार, विशाल यादव ( राहणार गोपाल नगर अमरावती शहर ) येथील हे प्रकरण असून विशाल आणि संबंधित तरुणी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आत्तापर्यंत विशाल हा तिचा पाठलाग करत असायचा मात्र तिने त्याच्याकडे कधी लक्ष दिले नाही. एकदा तिच्या हि बाब लक्षात आली त्यावेळी तिने त्याला माझा पाठलाग का करतो असे विचारले तेव्हा त्याने माझे तुझ्यावर प्रेम आहे मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे, असे देखील तो म्हणाला. मात्र तिने नकार दिल्यानंतर त्याचे पाठलाग करणे बोलण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार सुरू होते.
काही कालावधी गेल्यानंतर या तरुणीचे लग्न जुळले आणि तिचे लग्न होणार या कल्पनेने विशाल हा सैरभैर झालेला होता. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तो या तरुणीच्या होणाऱ्या सासरच्या घरी पोहोचला आणि त्याने जर तुम्ही तिला सून म्हणून घरात आणलं तर मी आत्महत्या करेन असे सांगितले. सासरच्या व्यक्तींनी या प्रकाराची कल्पना माहेरी दिली तेव्हा ते देखील गडबडून गेले आणि त्यानंतर सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही व्यक्तींनी मिळून त्याची रवानगी पोलिसात केली.