पुण्यात दापोडी परिसरात एक तरुण हातात रक्ताने माखलेला टिकाव घेऊन जगदंब जगदंब म्हणत होता अखेर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो सहा वर्षांपूर्वी आईवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा बदला घेण्यासाठी तो दिल्लीतून पुण्यात आलेला होता .दापोडी परिसरात राहणाऱ्या काटे दाम्पत्याचा त्याने डोक्यात फावडे घालून खून केला अन हातात फावडे घेऊन रक्ताने माखलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनला हजर होण्यासाठी निघाला होता मात्र त्या आतच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
उपलब्ध माहितीनुसार , मारुती उर्फ शंकर नारायण काटे (वय ६० वर्ष), संगीता मारुती काटे (वय ४६ वर्ष, दोघे रा. दापोडी) अशी खून झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. प्रसन्ना प्रमोदराव मंगरूळकर (वय ३२ वर्ष, रा. खेड मक्ता, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी प्रसन्ना मंगरुळकर हा उच्चशिक्षित असून त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. प्रसन्ना याला पिंपरी चिंचवड येथे एका खासगी बँकेत नोकरी लागली होती त्यानंतर साधारण २०१५ च्या सुमारास प्रसन्ना आणि त्याची आई हे दोघे दापोडी गावठाण येथे राहायला आले.
मयत मारुती काटे यांच्याकडे मायलेक भाडेकरू म्हणून रहात होते. दोन वर्ष ते भाडेकरू म्हणून राहत असताना या कालावधीत काटे याने त्याच्या आईवर अत्याचार केले असल्याचे प्रसन्ना याने म्हटलेले आहे . काटेची खोली सोडल्यानंतर ते मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे राहायला गेले आणि काही दिवसांनी त्याच्या आईचे निधन झाले तेव्हापासून तो आईच्या अत्याचाराचा बदला घेण्याचा प्रयत्न करत होता . यूपीएससी करण्यासाठी तो दिल्लीला गेला मात्र तिथेही काटे फोनवर दमदाटी करत असल्याचे त्याचे म्हणणे आहे .
सततचा त्याचा त्रास नकोच म्हणून दिल्ली ते पुणे असे विमानाचे तिकीट काढले आणि विमानतळावरून तो पायी चालत दापोडी येथे आला आणि एका दुकानातून टिकाव विकत घेतला. टिकाव घेऊन तो काटे याच्या घरात गेला आणि मारुती उर्फ शंकर काटे यांचा टिकावाने मारून खून केला मात्र पत्नी मध्ये आल्याने त्याने त्यांचाही खून केला रक्ताने माखलेल्या अवस्थेत हातात टिकाव घेऊन प्रसन्ना जगदंब जगदंब असे म्हणत पोलिस स्टेशनला जाण्यासाठी निघाला होता मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत.