‘ बिल्डर घराबाहेर या ‘ , अवघ्या काही क्षणात नको ते घडलं

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना अंबाजोगाई शहरात समोर आलेली असून रविवार पेठ भागात एका तरुणास बोलण्यासाठी म्हणून घराबाहेर बोलवण्यात आले आणि त्यानंतर रिंगण करून पाच ते सहा जणांनी दगडाने ठेचून त्याची अमानुषपणे हत्या केली आहे. 9 फेब्रुवारी रोजी ही घटना संध्याकाळी सहाच्या सुमारास घडलेली असून हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, नयूम अली चाऊस उर्फ बिल्डर ( वय 35 राहणार रविवार पेठ अंबाजोगाई ) असे मयत व्यक्तीचे नाव असून संध्याकाळी सहाच्या सुमारास पाच ते सहा जण यांनी त्यांना बोलण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलावून घेतले होते. त्यांच्यासोबत ते बोलत असतानाच अचानक एका व्यक्तीने फायटर आणि तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार केले आणि ते खाली पडल्याचे समजताच त्यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने ते जागीच मृत्युमुखी पडले हे लक्षात आल्यावर आरोपी तिथून फरार झाले.

प्राथमिक माहितीनुसार जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर दुसरीकडे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन त्यांचा मृतदेह स्वराती रुग्णालयात पाठवलेला आहे. हल्लेखोर हे परळी येथील असल्याची दाट शक्यता असून त्यांच्या शोधात पोलिसांनी पथके रवाना केलेली आहे.


Spread the love