ताई म्हणत ओळख वाढवली , तिच्या मोबाईलवरून ‘ भलताच प्रकार ‘

Spread the love

बीड येथे एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून एका व्यक्तीने पाणी पिण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या घरात प्रवेश केला. तिच्यासोबत गोड गोड गप्पा मारत आपली बहीण आहे असे म्हणत तिच्यासोबत ओळख वाढवली आणि त्यानंतर तिचा मोबाईल फसवून घेऊन स्वतःच्या मोबाईलवर त्यातून आय लव यू असे मेसेज पाठवले त्यानंतर तिला ब्लॅकमेल करण्यात आले आणि तिच्यासोबत त्याने अत्याचार देखील केले.

उपलब्ध माहितीनुसा, योगेश मस्के ( राहणार अंबिका चौक बीड ) असे आरोपीचे नाव असून सध्या तो फरार झालेला आहे. आरोपी हा मिस्तरी काम करत असून 28 वर्षीय विवाहितेच्या घरासमोर त्याचे काम सुरू होते त्यावेळी पाणी पिण्याच्या पाहण्याने 12 ऑगस्ट 2022 रोजी तो तिच्या घरी आला आणि गोड गोड गप्पा मारत तू माझी मानलेली बहीण आहेस असे म्हणत बोलायला सुरू केलेले होते त्यामुळे पीडित महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला.

20 ऑगस्ट २०२२ रोजी तो पुन्हा पीडित महिलेच्या घरी आला आणि माझा फोन स्विच ऑफ झालेला आहे. मला तुझ्या मोबाईलवरून एखाद एक फोन करायचा आहे असे म्हणत त्याने तिचा फोन घेतला आणि दीड तासांनी तिचा मोबाईल परत दिला. दरम्यानच्या काळात त्याने तिच्या फोनवरून स्वतःच्या फोनवर आय लव यू असे मेसेज पाठवले आणि त्यानंतर पीडित महिलेच्या फोनवरून पाठवलेले मेसेज त्याने डिलीट केले.

दुसऱ्या दिवशी तो पुन्हा पीडित महिलेकडे गेला आणि तू हे काय पाठवले आहे असे म्हणत तिला विचारणा केली त्यानंतर त्याने तुझे आलेले मेसेज तुझ्या नवऱ्याला दाखवतो असे म्हणत तिला दमदाटी केली आणि तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली त्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल करण्याची भीती दाखवत तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. सदर प्रकार कोणाला सांगितला तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी देखील त्याने धमकी दिली. त्याच्या या सततच्या त्रासाला वैतागून अखेर 10 फेब्रुवारी 2023 रोजी पीडित महिलेने त्याच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे.


Spread the love