वारंवार सांगूनही त्याच्या वर्तनात बदल होईना, मुलीच्या वडिलांनी रचला ‘ मास्टरप्लॅन ‘ अन ..

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना नांदेड इथे उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यातील हसनाळ याठिकाणी एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकारात त्याच्या मेहुण्याने देखील त्याला मदत केल्याचे समोर आले आहे . तब्बल एक महिन्यांनी या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे . मुक्रमाबाद पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून न्यायालयाने त्यांना 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

उपलब्ध माहितीनुसार, सुर्यकांत नागनाथ जाधव असं हत्या झालेल्या 22 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मुखेड तालुक्यातील हसनाळ (प.मु) येथील रहिवासी होता. मृत सुर्यकांत याचं गेल्या काही दिवसांपासून गावातील आणि नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते मात्र त्याच्या प्रेमप्रकरणास मुलीच्या वडिलांचा तीव्र विरोध होता. मुलीच्या वडिलांसोबत वादावादी झाल्यानंतर सुर्यकांत गाव सोडून निघून गेला मात्र अधून मधून तो गावी येत असल्याची कुणकुण मुलीच्या बापाला लागली.

प्रेयसीचे वडील माधव सोपान थोटवे याने आपले मेहुणे पंढरी गवलवाड याच्याशी संगनमत करून सुर्यकांतच्या हत्येचा कट रचला आणि गावाकडे येणाऱ्या रस्त्यावरच सुर्यकांत जाधव याला अडवलं आणि त्याला पकडून रावणगाव शिवारातील शेतात नेऊन त्याची निर्घृण हत्या केली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीनं शेतातच खोल खड्डा करुन त्यात सुर्यकांतचा मृतदेह पुरून टाकला. आरोपींनी इतका जबरदस्त प्लॅन केला होता मात्र गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना हिंट मिळाली आणि त्यानंतर तपास प्रेयसीच्या वडिलांपर्यंत जाऊन पोहचला.

आपला भाऊ घरी येत नाही आणि त्याचा फोनही लागत नाही नसल्याने मृत सुर्यकांतच्या भावाने त्याला सर्वत्र शोधलं मात्र त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. म्हणून मृताच्या भावानं मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली आहे.


Spread the love