पुणे ब्रेकिंग..मकोकाच्या आरोपीला मदत केली अन..

Spread the love

काही दिवसांपूर्वी मकोका गुन्ह्यातील एक आरोपी पोलिसांच्या कस्टडीतून पळून गेलेला होता. पोलिसांची या प्रकरणात चांगलीच नाचक्की झाली मात्र त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलेले आहे. घटना सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी घडलेली होती. पुणे ग्रामीण हद्दीतील खानापूर येथे ही घटना घडलेली होती

पोलिसांनी केलेल्या ताज्या कारवाईत प्रणव उर्फ चिक्या अरुण रणधीर ( वय 19 वर्ष राहणार बुद्ध वस्ती खानापूर तालुका हवेली जिल्हा पुणे ) आणि तन्मय उर्फ पिल्लू तानाजी हिवार ( वय 19 ) वर्ष यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. पोलीस कस्टडी मधील असलेला आरोपी संतोष बाळू पवार ( वय 23 राहणार खानापूर ) याला पळून जाण्यासाठी वरील आरोपींनी मदत केली होती . 3 फेब्रुवारी रोजी तो पोलिसांना ढकलून धमकी देऊन पळून गेलेला होता.

खानापूर येथे संतोषला आणण्यात आलेले होते त्यावेळी त्याला पळून नेण्याच्या उद्देशाने वरील दोन्ही आरोपी त्यासाठी स्कूटर देखील घेऊन आलेले होते त्यानंतर संतोष याने पोलिसांना हिसका दिला आणि तेथून पळ काढलेला होता त्यानंतर तो ताब्यात गेलेल्या घेण्यात आलेल्या व्यक्तींच्या गाडीवर बसून फरार झाला असे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.


Spread the love