महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना औरंगाबाद इथे समोर आलेली असून शहरातील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याने घटस्फोटासाठी फेमस असलेल्या एका मॅट्रिमोनियल साईटवर एका महिलेसोबत मैत्री केली आणि त्यानंतर तिला लग्नाचे आमीष दाखवत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. व्यापारी असलेल्या या व्यक्तीने तिच्याकडून तब्बल दहा लाख पन्नास हजार रुपये देखील उकळले असे पीडित महिलेचे म्हणणे आहे. सदर महिला ही विधवा असून आपला अपघात झाल्यानंतर देखील आपल्याला समजून न घेता आपल्यावर आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केला असे देखील म्हटलेले असून पीडित महिला ही मध्य प्रदेशातील जबलपूर इथे राहते.
पीडित महिला जबलपूर येथील विजयनगर परिसरात महिला रहायला असून आरोपी व्यक्तीच्या विरोधात तिने बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवलेला आहे . सुमित सुरेंद्र गुप्ता ( राहणार सिडको ) असे आरोपीचे नाव असून महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिने दुसऱ्या लग्नासाठी एका मॅट्रिमोनियल वेबसाईटवर नोंदणी केलेली होती त्यावेळी तिने सुमित गुप्ता यांना रिक्वेस्ट पाठवली आणि त्यानंतर ते फोनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहत होते.
आरोपी सुमित गुप्ता याने माझे माझ्या पत्नीसोबत पटत नाही. मी लवकरच तिच्या सोबत घटस्फोट घेणार आहे त्यानंतर आपण लग्न करू , असे आश्वासन तिला दिले आणि त्यानंतर काही दिवसात तो तिला भेटण्यासाठी जबलपूर इथे गेलेला होता. त्यानंतर 13 मे 2022 रोजी त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले . महिलेच्या म्हणण्यानुसार त्यावेळी आपला अपघात झालेला होता आपण आजारी होतो मात्र तरी देखील आरोपीने आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आणि आपल्याकडून तब्बल दहा लाख पन्नास हजार रुपये देखील त्याने उकळले असे महिलेचे म्हणणे आहे.