पुण्यात खळबळ..राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

पुणे शहरात वकील महिलेला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांना अटक करण्यात आली असून एका २५ वर्षीय तरुणीने त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. इरकल यांनी आपल्याला शिवीगाळ आणि स्पर्श करत मारहाण केली असेही त्यांचे म्हणणे आहे .पोलिसांनी दयानंद इरकल यांच्यासह संध्या माने इरकल तसेच इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी तरुणी ही काल रात्री पुण्यातील एस बी रोड वरुन पूना हॉस्पिटलच्या दिशेने तिच्या दुचाकीवरुन प्रवास करत होती. यावेळी तिने तिच्या पुढे असलेल्या चार चाकी ( एम एच १२ डी डब्ल्यू ०००१) वाहनाला तिने हॉर्न दिला. हॉर्न वाजवल्यामुळे इरकल यांना राग आला आणि ते गाडीतून खाली उतरले आणि तरुणीला मारहाण केली . गाडीत बसलेल्या संध्या माने इरकल यांनी त्या तरुणीच्या गालावर आणि गळ्यावर नखांनी बोचकरले तसेच हाताने आणि चपलेनी मारहाण केली तसेच त्यांच्यासोबत असलेल्या इतर २ जणांनी देखील त्या तरुणीला मारहाण करत शिवीगाळ केली असे म्हटलेले असून चतुर्श्रुंगी पोलिसांचा तपास सुरु आहे . दुसरीकडे ह्या प्रकरणापाठीमागे पोटनिवडणुकीची देखील पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे .


Spread the love