महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबईत समोर आलेली असून एका वृद्ध व्यक्तीला वयाच्या 65 व्या वर्षी पत्नीचा शोध घेणे चांगलेच महागात पडलेले आहे . लग्न जुळवणाऱ्या एका वेबसाईटवर या व्यक्तीने त्याची नोंदणी केलेली होती त्यानंतर एक महिला त्याच्या संपर्कात देखील आली मात्र तिने या व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि पीडित व्यक्तीची तब्बल साठ लाख रुपयांची फसवणूक केली.
गुन्हे शाखेच्या सायबर सेलमध्ये याप्रकरणी करण्यात आलेला असून तक्रारीमध्ये म्हटल्याप्रमाणे एका महिलेने व्हिडिओ कॉलच्या दरम्यान त्यांना अश्लील गोष्टी करण्यास सांगितले तर दुसरीकडे या महिलेने या सर्व गोष्टी तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्या आणि त्याचा व्हिडिओ बनवून आपल्या ओळखीतील इतर लोकांना पाठवण्याची तिने धमकी दिली.
आपण आपल्यासाठी जोडीदार शोधत होतो म्हणून आपण या वेबसाईटवर नोंदणी केली होती असे त्यांनी सांगितलेले असून त्यानंतर या पोर्टलवर एका महिलेसोबत आपली ओळख झाली होती. तिने आपल्याला मोबाईल नंबर दिला आणि आपल्यासोबत बोलणे देखील सुरु केले म्हणून तिच्यावर विश्वास बसला मात्र एके दिवशी व्हिडिओ कॉल सुरू असताना तिने अचानकपणे अंगावरील कपडे काढण्यास सुरुवात केले आणि आपल्याला देखील असेच करण्यासाठी भाग पाडले.
महिलेने सांगितल्याप्रमाणे आपण करत गेलो मात्र दुसरीकडे ती या प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती. असाच व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यानंतर तिने ब्लॅकमेल करत आपल्याला हा व्हिडिओ नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली आणि आपल्याकडे पैशांची मागणी केली आतापर्यंत कपल 60 लाख रुपयांना या महिलेने आपली फसवणूक केलेली असून अद्यापही तिची पैशाची बागत नसल्याने अखेर आपण पोलिसात आलेलो आहोत असे त्यांनी सांगितलेले आहे पोलिसांनी या आजोबांच्या तक्रारीची दखल घेत गुन्हा नोंदवलेला असून महिलेचा शोध सुरू केलेला आहे.