विवाहेच्छुक तरुणीचा आधी लग्नाला ‘ होकार मग नकार पुन्हा होकार ‘ , मात्र तोवर…

Spread the love

देशात अनेक वेगळ्या आणि विचित्र बातम्या समोर येत असतानाच अशीच एक घटना झारखंड इथे उघडकीस आली आहे . एका तरुणाचं लग्न जमले आणि काही विधीदेखील पार पडले मात्र मुलीने अचानक लग्न करण्याची इच्छा नसल्याने सांगितल्याने लग्न मोडले मात्र नंतर परत तिने लग्नाला होकार कळवला . मात्र तोवर उशीर झाला होता. शेवटी प्रकरण पंचायतीत गेले आणि या सर्व भानगडीमध्ये एका व्यक्तीला त्याचा जीव गमवावा लागला.

उपलब्ध माहितीनुसार, झारखंडमधील हिरोडिहमध्ये राहणाऱ्या जोंगी नावाच्या इंजिनिअर तरुणाचं एका तरुणीसोबत लग्न ठरलं. 10 जुलै या दिवशी धर्मशाळा येथे दोघांचा साखरपुडा देखील पार पडला. लग्नासाठी 29 डिसेंबर हा मुहूर्त देखील धरण्यात आला होता आणि दोन्ही परिवारात आनंदाचे वातावरण होते मात्र अचानक तरुणीने ‘ यु टर्न ‘ घेत लग्नाला नकार कळवला आणि लग्न मोडले. तरुण मुलाचा देखील याने हिरमोड झाला आणि त्या युवतीसोबत संबध तोडून टाकले.

काही दिवस गेल्यावर तरुणीने पुन्हा या तरुणाला फेसबुकवर गाठले आणि त्याला लग्न करण्यास आपण तयार असल्याचे कळवले मात्र झालेल्या प्रकारामुळे तरुण चिडला आणि त्याने तरुणीशी लग्न करण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं त्यामुळे तरुणी आणि तिचे नातेवाईक थेट पोलीस ठाण्यात गेले आणि लग्न ठरवून ते मोडत असल्याची तक्रार दिली.

‘ झालं गेलं विसरून ‘ पुन्हा नव्याने लग्न जमवण्यासाठी पंचायत बोलावण्यात आली. तरुण आणि तरुणीच्या लग्नाचा विषय सुरू असतानाच दोन्ही परिवारात चर्चा सुरु असतानाच एका ज्येष्ठ नागरिकाला हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


Spread the love