पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन एका 23 वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्कार करण्यात आलेला आहे त्यानंतर तिचे काही अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिचे जबरदस्तीने लग्न देखील लावण्यात आले . पीडित तरुणीने याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिलेली असून सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अभिमन्यू दिलीप शेरेकर, उदयन दिलीप शेरेकर , दिलीप शेरेकर, प्रशांत कोळी, कपिल आणि सागर अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे असून सहकारनगर परिसरातील हे प्रकरण आहे. पीडित तरुणी आणि आरोपी अभिमन्यू शेरेकर यांची सुरुवातीपासून ओळख असून अभिमन्यू याने तिला एकदा घरी बोलावले होते त्यावेळी तिला कोल्ड्रिंक पिण्यास दिले आणि त्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्याचा फायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि याचवेळी त्याने तिचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले असे पीडितेचे म्हणणे आहे.
पिडीतेला सुद्धा आली त्यावेळी तिच्या अंगावर कपडे नव्हते आणि तिच्यावर अत्याचार केल्याचे देखील तिच्या लक्षात आले. आरोपी अभिमन्यू याने जर तू हा प्रकार कोणाला सांगशील तर तुला जिवंत ठेवणार नाही तसेच तुझे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल करून देईल अशी धमकी दिली.
पीडित तरुणीने त्याला आपले फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती केली त्यावेळी त्याचा भाऊ आरोपी याचा भाऊ उदयन शेरेकर आणि आरोपीचे वडील दिलीप शेरेकर यांनी तिला मारहाण केली तसेच तिच्या आई-वडिलांना देखील मारून टाकण्याची धमकी दिली असे पीडित तरुणीचे म्हणणे असून सहकारनगर पोलीस ठाणे गाठत तिने आरोपींच्या विरोधात तक्रार दिली असून सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.