महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना यवतमाळ शहरातील मकरंद हॉटेल येथे उघडकीस आलेली असून हॉटेलमध्ये असलेल्या खोलीत 34 वर्षीय पोलीस कर्मचारी मयत अवस्थेत आढळून आलेला आहे. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी ही घटना उघडकीला आलेली असून मांगीलाल नामदेव चव्हाण ( वय 34 राहणार शेलु तालुका पुसद ) असे मयत व्यक्तीचे नाव असल्याचे समजते.
पुसद तालुक्यातील शेलु बुद्रुक येथे वडगाव जंगल पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते त्यानंतर त्यांची यवतमाळ शहरात बदली करण्यात आलेली होती. गावाला दररोज जाणे शक्य नसल्याने यवतमाळ शहरातील मकरंद हॉटेलमध्ये रूम त्यांनी भाड्याने घेतलेली होती. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी ते याच खोलीत मयत अवस्थेत आढळून आले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नसून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.