काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील रामपूर येथे रात्रीच्या वेळी एक नग्न महिला येते घराची बेल वाजवते आणि नागरिकांना घाबरवते असा प्रकार सुरू आहे . सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनेकदा ही महिला कैद झाली मात्र ही महिला कोण आहे याचे उत्तर अद्यापपर्यंत मिळत नव्हते मात्र रामपूर पोलिसांनी या संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करून महत्त्वाची माहिती नागरिकांना दिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पोलिसांनी या महिलेची ओळख पटवलेली असून ओळख जाहीर मात्र केलेली नाही. तिच्यावर गेल्या पाच वर्षांपासून उपचार सुरू असून ती मानसिक आजारी असल्याची माहिती आहे. सदर महिलेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियास व्हायरल झाले असून परिसरातील व्हाट्सअप ग्रुपमध्ये देखील हे व्हिडिओ जोरदार शेअर झाल्यानंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात या महिलेची भीती पसरलेली होती.. सगळीकडे असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जमा केले आणि त्याच्या आधारे या महिलेची ओळख पटवण्यात आली.
महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना बोलावून घेतले त्यावेळी त्यांनी आपल्या मुलीची मानसिक स्थिती चांगली नाही. तिच्यावर गेल्या पाच वर्षांपासून बरेली इथे उपचार सुरू आहेत असे त्यांनी सांगितलेले आहे . पोलिसांनी त्यांना आपल्या मुलीवर व्यवस्थित लक्ष ठेवण्याचा सल्ला दिलेला असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच कायदा हातात घेऊन तिला इजा करू नये असे आवाहन केलेले आहे .