शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने त्याच्या पत्नीवर लोखंडी शस्त्राने वार केलेले आहेत . सदर घटनेत पत्नी गंभीर जखमी झालेली असून तिला 14 टाके पडलेले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, गणेश राजाराम डिंबळे ( वय 37 राहणार थेरगाव ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून बारा वर्षांपूर्वी त्याचा विवाह झालेला होता. त्यांना दोन मुले देखील असून कौटुंबिक वादामुळे आता पती-पत्नी एकत्र राहत नाहीत . गणेश हा ड्रायव्हर म्हणून काम करत असून त्याची पत्नी एका ट्रॅव्हल एजन्सीत काम करते. चारित्र्याच्या संशयावरून आरोपी सातत्याने तिला त्रास देत होता.
सोमवारी संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास आरोपी महिला काम करत असलेल्या ठिकाणी आला तेव्हा फिर्यादी महिला आणि तिचा एक सहकारी चहा घेण्यासाठी बालेवाडी येथील अष्टविनायक चौकात आल्याची माहिती त्याला समजली त्यानंतर तो तिथे आला आणि ऑफिसमधील या सहकाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली याच दरम्यान पत्नीमध्ये पडली म्हणून त्याने तिच्या मानेवर डोक्यात लोखंडी शस्त्राने वार केले आणि तुला जिवंत सोडणार नाही असे देखील तो म्हणाला. पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे पुढील तपास करत आहेत.