सोशल मीडियावर सध्या गुजरातच्या एका प्रियकराची जोरदार चर्चा सुरू असून सुरत येथे हा प्रकार समोर आलेला आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आपले एकतर्फी प्रेम असलेली ही तरुणी कुठे जाते यासाठी गुजरातच्या एका महाभागाने चक्क तिच्या गाडीला गुपचूप जीपीएस लावलेला होता आणि त्या माध्यमातून तो तिचे ट्रॅकिंग करत असायचा. तरुणी कुठेही गेली तरी तो काही सेकंदात तिच्यासमोर हजर व्हायचा.
सदर तरुणीला काही दिवस हा प्रकार केवळ योगायोग असेल असे वाटायचे मात्र त्यानंतर कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी आरोपी असलेला निकुंज पटेल यांनी या तरुणीच्या स्कुटीला चक्क जीपीएस लावल्याचे समोर आले . जीपीएसच्या माध्यमातून आपण ती कुठे आहे याचे लोकेशन जाणून घायचो असेही त्याने सांगितलेले असून ती आपल्या सोबत बोलतच नव्हती म्हणून आपण हा प्रकार केला असे त्याने म्हटलेले आहे.
व्हॅलेंटाईन सुरू झाल्यानंतर त्या दिवशी आपण तिला भेटून आपल्या प्रेमाची कबुली देणार होतो त्या उद्देशाने आपण काही दिवसांपूर्वी तिच्या स्कुटीमध्ये जीपीएस किट फिट केलेली होती त्या माध्यमातून मोबाईलवर आपण ती कुठे आहे याचे लोकेशन देखील ट्रेस करायचो. जिथे जाईल तिथे अवघ्या काही सेकंदात आपण हजर व्हायचो आणि व्हॅलेंटाईनच्या दिवशी तिला भेटून आपले प्रेम व्यक्त करणार होतो मात्र त्याआधीच प्रकरण पोलिसात गेले असे त्याने सांगितलेले असून सदर तरुणीने आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे .