महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नालासोपारा परिसरात उघडकीला आलेली असून एका व्यक्तीने त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची अत्यंत अमानुषपणे हत्या केली त्यानंतर त्याने तिचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बेडमध्ये टाकला आणि त्यानंतर तो फरार झाला. तुळींज पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत रेल्वे पोलीस फोर्सच्या मदतीने त्याला राजस्थान बॉर्डरवर ताब्यात घेतलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, हार्दिक शहा असे आरोपीचे नाव असून मेघा तोरबी असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपी हा काहीच काम धंदा करत नसायचा तर त्याची लिव्ह इन पार्टनर ही एका ठिकाणी नर्स म्हणून कार्यरत होती. तो काहीच काम धंदा करत नसल्याने त्यांचे सतत वादविवाद होत होते त्यातून त्याने तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह बेडमध्ये टाकून तिथून पलायन केलेले होते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला यावेळी या महिलेची गळा आवळून हत्या झाल्याचे समोर आले.
आरोपीने त्याच्या राहत्या घरात या महिलेची हत्या केली आणि घरातील जे काही विकण्यायोग्य सामान होते ते विकून टाकले आणि त्यानंतर त्याने तेथून पलायन केले. सुमारे चार दिवसांपूर्वी त्याने ही हत्या केल्याचे समोर आलेले असून पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाला सुरुवात केली त्यावेळी तो राजस्थानला रेल्वेने जात असल्याचे लक्षात आले. रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला नागदा रेल्वे स्थानक येथे बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याला महाराष्ट्रात आणण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे.