धक्कादायक..पोलिसांसमोरची ‘ ओव्हर ऍक्टिंग ‘ महागात पडली अन मास्टरप्लॅन फसला

Spread the love

आजकाल लोक पैसे कमावण्यासाठी काय करतील याचा नेम राहिलेला नाही. अशीच एक घटना उघडकीस आली असून पैसे मिळवण्यासाठी पतीने चक्क स्वतःच्या बायकोचा खून केला मात्र त्याचा हा प्लॅन फसला आणि त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. अमेरिकेत टेक्सास इथं ही घटना घडलेली असून ख्रिस्तोफर कॉलीन्स असे या पतीचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणारा ख्रिस्तोफर कॉलीन्स आणि त्याची पत्नी युआन हुआ लिआंग यांनी लाईफ इन्शुरन्स घेतला होता. 1.4 कोटी रुपयांचं संरक्षण असणारा हा विमा घेतल्यानंतर पती ख्रिस्तोफरच्या मनात वेगळाच प्लॅन आला आणि त्याने चक्क पत्नीची हत्या केली. पॉलिसी काढल्याचा दुसऱ्याच दिवशी युआनचा खून झाल्याचं निष्पन्न झाल्याने पोलिसांच्या भुवया उंचावल्या आणि त्यांनी पतीपासूनच चौकशीला सुरुवात केली .

घटना घडली त्या दिवशी त्याने स्वतःच पोलीस ठाण्यात फोन केला आणि आपल्या घरात काही चोर घुसले आहेत असे सांगितले. आपण काही पुरुषांचा आवाज ऐकला असून आपल्या पत्नीला त्यापासून धोका आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर येऊन पत्नीची चोरांच्या तावडीतून सुटका करावी, अशी विनंती त्यानं पोलिसांना केली. त्याच्या फोनची तातडीने दखल घेण्यात आली आणि पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना युआन मृतावस्थेत पडल्याचं दिसून आले.

पत्नीचा मृतदेह पाहून त्याने पोलिसांच्या समोरच तिच्या मृतदेहापाशी जाऊन ढसाढसा रडण्याचे नाटक सुरु केले मात्र त्याची ही नौटंकी पोलिसांच्या लक्षात आली आणि पोलिसांनी त्याच्यावरच तपासाची दिशा केंद्रित केली. चोरट्यांनी पत्नीचा खून केल्याचं भासवून विम्याचे पैसे लाटण्याचा त्याचा प्लॅन होता मात्र त्याचा प्लॅन पुरता फसला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.


Spread the love